जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचा फंडाकोमॉर्बिड रुग्णांचे होणार ट्रेसिंग
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात 13 महिन्यात तब्बल 3031 जणांचे कोरोनाने बळी गेलेले आहेत. दररोज 40 हून अधिक जणांचे बळी जात आहेत. मृत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवीन फंडा सुरु केला आहे. त्यामध्ये कोमॉर्बिड रुग्णाचे सर्व्हे, त्यांची चाचणी आणि त्यांच्यावर उपचार असा ट्रीपल टीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला असून त्याची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यामुळे आता प्रत्येक गावातील कोमॉर्बिड असलेल्या व्यक्तीचा सर्व्हे होणार असून त्यांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.
सातारा जिह्याचा मृत्यूदर रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नव्याने ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट ही कार्यपद्धती सुरु केली आहे. त्याबाबतच्या समित्या नियुक्त करुन त्यांच्यावर जबाबदाऱया सोपवण्यात आल्या आहेत. जिह्याचा मृत्यूदर 1.9 टक्के इतका आहे. तर देशाचा मृत्यूदर 1.09 टक्के, तर महाराष्ट्राचा मृत्यूदर 1.5 टक्के एवढा आहे. कोमॉर्बिड व्यक्तीमध्ये लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचा शोध घेवून त्यांची तपासणी करणे व लक्षणानुसार उपचार करणे आवश्यक बनले आहे. ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. त्यासाठी ग्रामीण भागात कोमॉर्बिड रुग्णाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आणि त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे, पॉझिटीव्ह आढळून आलेल्यांवर उपचार करणे असा नियोजनबद्ध कार्यक्रम करण्यात आला आहे. त्यासाठी आशांकडे गावपातळीवर कोमॉर्बिड रुग्णांचे सर्व्हेक्षण करुन दररोज किमान 25 रुग्णांना भेट देणे, त्यांच्यात लक्षण आढळून आल्यास ऑक्सीजनची पातळी 94 च्या खाली असल्यास गटप्रवर्तकांना माहिती देणे, गटप्रवर्तकांनी तालुका संघटकांना माहिती देणे, दररोज दोन ते तीन गावांना भेट देणे, तालुका संघटकांनी तालुका आरोग्य आधिकाऱयांना माहिती देणे, तालुका वैद्यकीय अधिकाऱयांनी संशयितांची रॅपिड टेस्ट करुन घेणे, बाधित आढळून आल्यास उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देणे, रॅपिडमध्ये निगेटीव्ह आल्यास आणि लक्षणे असल्यास आरटीपीसीआर करणे, तसेच प्राथमिक वैद्यकीय केंद्रांना जबाबदाऱया दिल्या आहेत.
अशी आहेत टीम
नोडल अधिकारी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, त्यांना सहाय्यक म्हणून कृषी अधिकारी अनिल काळे, जिल्हा समन्वयक करण जगताप, विस्तार अधिकारी संदीप दीक्षित, ग्रामविकास अधिकारी संजय जाधव, एन.व्ही. भोसले, सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक प्रतिक्षा निकम आहेत. तसेच तालुका नोडल अधिकारी म्हणून सातारा- सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढमाळ, कोरेगावö बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजितकुमार इंगवले, खटाव- सहाय्यक गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, माणö सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगुले, फलटण- सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक गुळवे, खंडाळा- बाल विकास प्रकल्प अधिकारी एम. ए. भोईटे, वाई- सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार, जावलीö सहाय्यक गटविकास अधिकारी शोभा सोनावणे, महाबळेश्वर- सहाय्यक गटविकास अधिकारी आर.व्ही.सांगळे, कराडöसहाय्यक गटविकास अधिकारी सौ. यु. जे. साळुंखे, तर पाटणसाठी सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.