ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेले पाच दिवस युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु असुन दोन दिवसापुर्वीच युक्रेन ने आपल्या राजधानीत शिरलेल्या रशियन जवळपास 3600 सैन्याला ठार केले असुन रशियाने ही युक्रेनच्या राजधानीपर्यंत शिरकाव केला असल्याचे म्हटले आहे. हीच स्थिती आज ही असुन हिंसाचाराने अनेक नागरिकांचा हकनाक बळी ही जात असल्याचे व्हीडिओ ही सातत्याने व्हायरल होत आहेत. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाशी चर्चेपूर्वी आपण मागे हटणार नसल्याचे पुन्हा एकदा सांगितले आहे.
देशाला संबोधित करताना झेलेन्स्की यांनी जर तुम्हाला मृत्यू टाळायचा असेल तर रशियात परत जा असा इशारा दिला आहे. युक्रेनियन शिष्टमंडळाने बेलारूसच्या सीमेवर रशियन प्रतिनिधींना चर्चेसाठी भेटण्याआधी झेलेन्स्की यांनी हे विधान केले आले. रशियाने ताबडतोब युद्धविराम जाहीर करावा. तुम्ही रशियात परत जा नाहीतर तुम्हाला ठार मारले जाईल, असा इशारा झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याला दिला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने स्पष्ट केल्यानुसार, युक्रेनचा प्रत्येक नागरिक हा सैनिक आहे आणि शेवटपर्यंत रशियाविरुद्ध लढेल. ज्यांना युद्ध लढण्याचा अनुभव आहे. अशा कैद्यांना तुरुंगातून बाहेर काढण्यात येईल. या लोकांना रशियाविरुद्धच्या युद्धात उतरण्याची संधी दिली जाईल, असे युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.