कोळपे येथील प्रकार : मृत व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याची अफवा पसरवल्याचा आरोप
वार्ताहर / वैभववाडी:
तालुक्मयातील कोळपे येथील आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा स्मशानात घेतलेल्या स्वॅबचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती पसरवून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱया बेजबाबदार डॉ. सचिन बर्गे यांच्याविरोधात प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. अन्यथा, आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी दिला आहे.
कोळपे येथील 48 वर्षीय व्यक्तीने 29 ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात आणला असता तेथील डॉ. सचिन बर्गे यांनी विच्छेदन करण्यास नकार दिला. तालुका वैद्यकीय अधिकारी उमेश पाटील यांनी विनंती करूनही त्यांनी शवविच्छेदन केले नाही. त्यानंतर डॉ. पाटील यांनी विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृत व्यक्तीचे नातेवाईक मुंबई येथे असल्याने ते येईपर्यंत मृतदेह कोळपे येथे घरी ठेवण्यात आला होता. डॉ. बर्गे यांनी मध्यरात्री बारा वाजता मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना फोन करून ‘मृतदेहावर अजून अंत्यसंस्कार का केले नाही? मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असू शकते!’, असे सांगितले. त्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास डॉ. बर्गे यांनी स्वतः पीपीई कीट घालून कोळपे येथे स्मशानभूमीत जात मृत व्यक्तीचे स्वॅब घेतले. त्यानंतर मृत व्यक्ती पॉझिटिव्ह आहे, असे फोन करून त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना सांगितले. डॉ. बर्गे यांना वरि÷ांची कोणतीही परवानगी न घेता रॅपिड टेस्टद्वारे मृत व्यक्तीचा स्वॅब घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? डॉ. बर्गे यांचे हे कृत्य वैद्यकीय क्षेत्राला अशोभनीय आहे. मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती, असे त्यांना वाटत असेल, तर शवविच्छेदन करण्यापूर्वी त्यांनी टेस्ट का घेतली नाही? स्वॅबचे नमुने जिल्हा रुग्णालयाकडे का पाठविले नाहीत? पॉझिटिव्ह रुग्ण जाहीर करण्याचा अधिकार डॉ. बर्गे यांना कोणी दिला, असे अनेक प्रश्न काझी यांनी उपस्थित केले आहेत.
डॉ. बर्गे यांचे कृत्य अशोभनीय!
डॉ. बर्गे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. अशा डॉक्टरवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. कोरोनाच्या काळात तालुक्मयातील सर्वच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी शिस्तबद्ध नियमांचे पालन करून चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा देत आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. मात्र, डॉ. बर्गे यांच्या या कृत्यामुळे इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱयांच्या प्रामाणिक सेवेला गालबोट लागत आहे. डॉ. बर्गे यांच्यावर प्रशासनाने योग्य कारवाई करावी. तसेच मृत व्यक्तीच्या स्वॅब रिपोर्टची योग्य माहिती प्रशासनाने जनतेला द्यावी, अशी मागणी काझी यांनी केली आहे.
डॉ. बर्गे यांच्यावर कारवाईचा बडगा
या घटनेसंदर्भात येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नवनाथ कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, डॉ. बर्गे यांना स्वॅब घेण्याचा अधिकार नाही. ते लॅब टेक्निशियन नाहीत. तसेच मृत व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह नाहीत. अशा प्रकारामुळे आरोग्य विभागाची बदनामी होऊ नये म्हणून डॉ. बर्गे यांना आरोग्य सेवेतून कमी केले असल्याचे त्यांनी सांगितले