प्रतिनिधी/पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची नवी दिल्लीत गोव्याच्या दिवंगत माजी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्री शुक्रवारी सकाळी येथून नवी दिल्लीला रवाना झाले व त्यांनी दि. 18 रोजी मरण पावलेल्या माजी राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले व गोमंतकीय जनतेच्यावतीने श्रद्धांजली वाहिली. श्रीमती मृदुला सिन्हा यांचे पती रामकृपाल सिन्हा यांची भेट घेऊन मुख्य़मंत्र्यांनी त्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.