मुंबई
मॅक्रोटेक डेव्लहपर्स लिमिटेड (यापूर्वीची लोढा डेव्हलपर्स) कंपनी आपला आयपीओ भारतीय भांडवली बाजारात दाखल करण्याचा विचार करते आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 2 हजार 500 कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगण्यात येते. सदरचा आयपीओ 7 एप्रिल रोजी बाजारात दाखल केला जाणार आहे. सदरचा आयपीओ 9 एप्रिलला बंद होणार आहे, म्हणजेच यापूर्वी इच्छुक गुंतवणूकदारांना यात गुंतवणूक करता येणार आहे. सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीने आयपीओला परवानगी दिली आहे. लोढाचा याप्रकारे सार्वजनिकरित्या बाजारात येण्याचा तिसरा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.