प्रतिनिधी / बेळगाव :
कोरोनामुळे मॅक्सिकॅब व्यवसाय करणे अवघड बनले आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वाहने घेण्यासाठी विविध बँका, सोसायटय़ांमधून कर्जदेखील घेतले आहे. तेव्हा त्याचा हप्ता भरणे अशक्मय झाले आहे. याबाबत बँकांना वसुलीसाठी तगादा लावू नये, अशी सूचना करावी, अशी मागणी मॅक्सिकॅब चालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्धारे करण्यात आली.
गेल्या साडेतीन महिन्यांपासून मॅक्सिकॅब व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे आम्ही बेरोजगार झालो आहे. आता मॅक्सिकॅबचे टॅक्सदेखील भरणे अवघड झाले आहे. टेम्पो मालकांना आरटीओकडून टॅक्स भरण्यासाठी नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्या नोटिसाही मागे घ्याव्यात तसेच यावषीचे संपूर्ण टॅक्स रद्द करावे, अशी मागणी टेम्पो चालक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
महसूल अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले. यावेळी सी. आर. संगण्णावर, बी. बी. नाईक, रोहित अनगोळकर, विक्रम करिमुदकण्णावर, यमनाप्पा तळवार, संगम राचण्णावर, रुद्राप्पा गौरवण्णावर यांच्यासह टॅक्सी चालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.