मॅक्सीकॅब चालकांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून मॅक्सीकॅब व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तेंव्हा मॅक्सीकॅब सुरु करण्यास परवानगी द्या, अशी मागणी मॅक्सीकॅब चालकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
व्यवसाय बंद असल्यामुळे टॅक्स भरणे अवघड आहे. तेंव्हा सहा महिन्याचा टॅक्स देखील रद्द करावा आणि व्यवसायाला सुरुवात करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी केली आहे. बेळगाव जिह्यासह उत्तर कर्नाटकमध्ये मोठय़ा प्रमाणात मॅक्सीकॅब आहेत. आता राज्यामध्ये इतर वाहनांना फिरण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र आम्हाला अजूनही मुभा देण्यात आली नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. तेंव्हा तातडीने मॅक्सीकॅब सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे.
मागीलवेळी आम्ही पॅकेज द्यावे, अशी मागणी केली होती. महिन्याला पाच हजार रुपये द्यावेत. मॅक्सीकॅब घेताना अनेकांनी बँकांमधून कर्ज घेतले आहे. त्यामुळे ते कर्ज भरणे अशक्मय आहे. तेंव्हा कर्ज भरण्यास सवलत द्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी उत्तर कर्नाटक मॅक्सीकॅब चालक संघटनेचे अध्यक्ष सी. एस. राचण्णावर, उपाध्यक्ष प्रवीण फडके, सेपेटरी रियाजअहमद हिरेकुडी यांच्यासह टॅक्सीचालक उपस्थित होते.