वृत्तसंस्था / दुबई :
20 षटकांची निर्धारित लढत टाय, सुपरओव्हरही टाय आणि त्यानंतर दुसऱया सुपरओव्हरमध्ये पंजाबची बाजी, अशा पद्धतीने आयपीएल स्पर्धेतील रविवारची दुसरी लढत रंगली. क्षणाक्षणाला रोमांच वाढवणाऱया या लढतीने चाहत्यांसाठी खऱया अर्थाने डोळय़ाचे पारणे फेडले.
दुसऱया सुपरओव्हरमध्ये पोलार्डने 4 चेंडूत 8 तर पंडय़ाने 1 धावा केली. जॉर्डनने 2 वाईड चेंडू टाकल्याने अवांतर धावांसह मुंबईने 11 धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात गेलने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला व दुसऱया चेंडूवर एकेरी धाव घेतली. 4 चेंडूत 5 धावा आवश्यक असताना मायंकने चौकार वसूल केला व सामना बरोबरीत आला. 3 चेंडूत एका धावेची गरज असताना त्याने पुन्हा एकदा चौकार लगावला आणि इथेच पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.
तत्पूर्वी, पहिल्या सुपरओव्हरमध्ये पंजाबने बुमराहच्या षटकात 2 बाद 5 अशी धावसंख्या केली. केएल राहुल 4 चेंडूत 4 धावांवर तर पूरन शून्यावर बाद झाला. हुडा एका धावेवर नाबाद राहिला. बुमराहचे षटकातील सर्व चेंडू यॉर्करच्या टप्प्यावर ठेवले. प्रत्युत्तरात 6 धावांची आवश्यकता असताना शमीच्या षटकात डी कॉक व रोहित यांनी पहिल्या 3 चेंडूंवर 3 धावा घेतल्या. 3 चेंडूत 3 धावा आवश्यक असताना रोहित यॉर्करवर एकही धाव घेऊ शकला नाही आणि 2 चेंडूत 3 धावा, असे समीकरण झाले. रोहितला एकेरी धाव घेता आली आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावा असे चित्र होते त्यानंतर पुन्हा लढत टाय झाली होती.
केरॉन पोलार्ड (12 चेंडूत नाबाद 34) व नॅथन कोल्टर-नाईल (12 चेंडूत नाबाद 24) यांनी शेवटच्या तीनच षटकात 54 धावा झोडपल्यानंतर मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 6 बाद 176 धावांपर्यंत जोरदार मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर आघाडीचे तीन फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने मुंबईचा संघ या लढतीत काहीसा अडचणीत होता. नंतर पोलार्ड व नाईल यांनी सातव्या गडय़ासाठी 21 चेंडूत 57 धावांची अभेद्य भागीदारी
साकारली.
प्रारंभी, डावखुरा मध्यमगती गोलंदाज अर्शदीपने कर्णधार रोहित शर्मा (9) व इशान किशन (7) यांना स्वस्तात गारद केले तर शमीने सुर्यकुमारला खाते उघडण्यापूर्वीच तंबूत परत धाडले. यामुळे, मुंबई इंडियन्स एकवेळ 5.1 षटकात 3 बाद 38 असा अडचणीत सापडला होता. क्विन्टॉन डी कॉकने मात्र 43 चेंडूत 53 धावांची आतषबाजी करत ही पडझड सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याच्या खेळीत 3 चौकार व 3 षटकारांचा समावेश राहिला. कृणाल पंडय़ाने 30 चेंडूत 34 धावा केल्या. गोलंदाजीत मोहम्मद शमीने 30 धावात 2 तर अर्शदीप सिंगने 35 धावात 2 बळी घेतले.
धावफलक
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा त्रि. गो. अर्शदीप 9 (8 चेंडूत 2 चौकार), क्विन्टॉन डी कॉक झे. मायंक, गो. जॉर्डन 53 (43 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), सुर्यकुमार यादव झे. अश्विन, गो. शमी 0 (4 चेंडू), इशान किशन झे. अश्विन, गो. अर्शदीप 7 (7 चेंडूत 1 चौकार), कृणाल पंडय़ा झे. हुडा, गो. रवी बिश्नोई 34 (30 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा झे. पूरन, गो. शमी 8 (4 चेंडूत 1 षटकार), केरॉन पोलार्ड नाबाद 34 (12 चेंडूत 1 चौकार, 4 षटकार), नॅथन कोल्टर-नाईल नाबाद 24 (12 चेंडूत 4 चौकार). अवांतर 7. एकूण 20 षटकात 6 बाद 176.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-23 (रोहित, 2.5), 2-24 (सुर्यकुमार, 3.3), 3-38 (इशान, 5.1), 4-96 (कृणाल, 13.5), 5-116 (हार्दिक, 15.3), 6-119 (डी कॉक, 16.3).
गोलंदाजी : ग्लेन मॅक्सवेल 4-0-24-0, मोहम्मद शमी 4-0-30-2, अर्शदीप सिंग 3-0-35-2, ख्रिस जॉर्डन 3-0-32-1, मुरुगन अश्विन 3-0-28-1, दीपक हुडा 1-0-9-0, रवी बिश्नोई 2-0-12-1.
किंग्स इलेव्हन पंजाब : केएल राहुल त्रि. गो. बुमराह 77 (51 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), मायंक अगरवाल त्रि. गो. बुमराह 11 (10 चेंडूत 1 चौकार), ख्रिस गेल झे. बोल्ट, गो. चहर 24 (21 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), पूरन झे. कोल्टर-नाईल, गो. बुमराह 24 (12 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), ग्लेन मॅक्सवेल झे. शर्मा, गो. चहर 0 (2 चेंडू), दीपक हुडा नाबाद 23 (16 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), ख्रिस जॉर्डन नाबाद 13 (8 चेंडूत 2 चौकार). अवांतर 4. एकूण 20 षटकात 6 बाद 176.
गडी बाद होण्याचा क्रम : 1-33 (मायंक, 3.3), 2-75 (गेल, 9.1), 3-108 (पूरन, 12.5), 4-115 (मॅक्सवेल, 13.3), 5-153 (केएल राहुल, 17.3), 6-176 (जॉर्डन, 19.6)
गोलंदाजी : बोल्ट 4-0-48-0, कृणाल 2-0-12-0, बुमराह 4-0-24-3, नाईल 4-0-33-0, पोलार्ड 2-0-26-0, राहुल चहर 4-0-33-2.