वृत्तसंस्था/ सिडनी
दक्षिण आफ्रिका दौऱयासाठी ऑस्ट्रेलियाने बुधवारी कसोटी संघाची घोषणा केली असून मॅथ्यू वेडला डच्चू देण्यात आला आहे तर टिम पेनकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.
भारताविरुद्धच्या मालिकेतील चारही कसोटीत वेड खेळला होता, त्यापैकी दोन सामन्यात त्याने वॉर्नरच्या गैरहजेरीत सलामीवीराची भूमिका बजावली होती. पण आठ डावात त्याला केवळ 173 धावा जमविता आल्या. काही खराब फटकेही त्याने मारले होते, परिणामी त्याला संघातील स्थान गमवावे लागले आहे. त्याच्या जागी यष्टिरक्षक ऍलेक्स कॅरेला निवडण्यात आले आहे. मात्र न्यूझीलंड दौऱयात होणाऱया टी-20 मालिकेसाठी वेडला संघात कायम ठेवताना त्याच्याकडे उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. फॉर्म नसला तरी ऍरोन फिंचकडे नेतृत्व कायम असेल. दक्षिण आफ्रिका दौऱयात ऑस्ट्रेलिया 3 कसोटी खेळणार असून आधीच्या नियोजनाप्रमाणे ही मालिका फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार होती. पण कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे त्याच्या तारखा अजून निश्चित करण्यात आलेल्या नाहीत. मात्र मार्च-एप्रिलमध्ये ही कसोटी मालिका होण्याची अपेक्षा आहे.
न्यूझीलंडमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार असून 22 फेबुवारी ते 7 मार्च या कालावधीत हे सामने होणार आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱयावेळीच हे सामने होणार असल्याने ऑस्ट्रेलियाचे काही खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत. भारताविरुद्ध 2-1 अशी मालिका गमविल्यानंतर कर्णधार पेनवर बरीच टीका झाली होती. पण क्रिकेट ऑस्ट्रेलिया निवड समितीने त्याच्यावर भरवसा दाखवत या दौऱयात नेतृत्व त्याच्याकडेच कायम ठेवले आहे.
दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ ः टिम पेन (कर्णधार), कमिन्स, ऍबॉट, ऍलेक्स कॅरे, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, हॅझलवुड, टॅव्हिस हेड, मोइजेस हेन्रिक्स, मार्नस लाबुशाने, नाथन लियॉन, मायकेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्क स्टेकेटी, मिशेल स्वेप्सन, डेव्हिड वॉर्नर.
न्यूझीलंड मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा टी-20 संघ ः ऍरोन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, ऍश्टन ऍगर, जेसन बेहरेनडॉर्फ, मिशेल मार्श, मॅक्सवेल, बेन मॅकडरमॉट, रिली मेरेडिथ, जोश फिलिप, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, तन्वीर सांघा, डार्सी शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, ऍश्टन टर्नर, ऍन्ड्रय़ू टाय, ऍडम झाम्पा.