प्रतिनिधी /बेळगाव
डोक्मयावरून मैला वाहने किंवा डेनेज चेंबरमध्ये उतरून काम करण्यावर शासनाने बंदी घातली आहे. ही कामे विविध उपकरणाद्वारे करण्याची सूचना देण्यात आली आहे. हे काम कोणत्या प्रकारे करावे याबाबतचे प्रशिक्षण महापालिकेच्या डेनेज स्वच्छता कामगार व सेफ्टीक टँक क्लिनिंग कामगारांना मंगळवारी देण्यात आले. राष्ट्रीय सफाई कामगार सुरक्षा विभागाच्यावतीने हे प्रशिक्षण देण्यात आले.
काही ठिकाणी डेनेज तुंबल्यास त्याची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कामगारांना डेनेज चेंबरमध्ये उतरण्याची सूचना केली जाते. स्वच्छता कामगारांना घातक असून, अशा प्रकारची कामे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. डेनेज चेंबर स्वच्छ करण्यासाठी तसेच सेफ्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे तयार करण्यात आली आहेत. अशा उपकरणांची खरेदी महापालिकेने केली आहे. या उपकरणांचा वापर करून स्वच्छतेची कामे कशी करावीत याबाबतची माहिती स्वच्छता कामगारांना प्रशिक्षण शिबिरावेळी देण्यात आली. याप्रसंगी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंते हणमंत कलादगी, पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, प्रवीण किल्लारी आदींसह सेफ्टीक टँक क्लिनिंग कामगार, डेनेज चेंबर स्वच्छता कामगार व उपकरणे हाताळणारे ड्रायव्हर व क्लिनर उपस्थित होते.