ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
डिस्कव्हरी चॅनेलवरील प्रसिद्ध शो ‘मॅन वर्सेस वाईल्ड’ साठी रजनीकांत व बेयर ग्रिल्स यांनी मंगळवारी कर्नाटकमधील बांदीपुर टायगर रिझर्व्हमध्ये शुटींग सुरू केले आहे. मात्र, या शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांत व बेयर ग्रिल्स कर्नाटकमधील बांदीपुर वाघ अभयारण्यात शूटिंग करत असताना रजनीकांत यांना थोडी दुखापत झाली आहे. एका वन अधिकाऱयांनी सांगितले की, रजनीकांत यांचे संतुलन बिघडले आणि त्यांच्या पायाच्या घोटय़ाला दुखापत झाली. त्यांच्या हाताला व कोपरालाही थोडेसे खरचटले.
ते म्हणाले, त्यांची दुखापत लवकरच बरी होईल. दरम्यान, रजनीकांत आता मैसूर येथे रवाना झाले आहेत. रजनीकांत यांच्या शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये त्यांनी निळय़ा रंगाचे जॅकेट परिधन केले आहे.