वार्ताहर/ कुडाळ
पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर आज सकाळी मॅप्रो गार्डनच्या अलीकडच्या वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात एक जन जागीच ठार झाला तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहीती अशी की, पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर सकाळी 10 : 55 च्या सुमारास मॅप्रो गार्डनच्या अलीकडच्या वळणावर अंदाज न आल्याने मोटारसायकल व ऍक्टीव्हाचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये अनिल लक्ष्मण सपकाळ हा जागेवरच मृत्युमुखी तर ओंकार मोरे हा गंभीर जखमी झाला आहे.
अनिल लक्ष्मण सपकाळ वय वर्षे 52 सद्या (रा. मेटगृताड, ता.महाबळेश्वर मूळ रा. दह्याट, ता. वाई), हे आपल्या श्प्11ँभ्2760 हे आपल्या ख्ऊश् मोटर सायकलवरून पाचगणीच्या दिशेस येत होते. तर ओंकार मोरे, वय वर्षे 24 (रा. वाडाकुंभरोशी, ता. महाबळेश्वर) हा युवक आपल्या ऍक्टिव्हा मोपेड श्प्11न्न् 7253 वरून महाबळेश्वर दिशेने जात असताना दोन्ही दुचाकीचा सकाळीच्या सुमारास पाचगणीपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर मॅप्रो गार्डनच्या अलीकडील वळणावर समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये अनिल लक्ष्मण सपकाळ हा जागीच मृत्यूमुखी पडला तर ओंकार मोरे गंभीर जखमी झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच पाचगणी पोलीस स्टेशनचे सपोनि सतीश पवार आपले सहकारी वैभव भिलारे, नितीन कदम, संतोष कदम, अविनाश बाबर, विजय मुळे, सागर नेवसे, यांच्या सहित तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर परिस्थिती पाहून लागलीच जखमी युवकास तात्काळ उपचारार्थ सातारा येथे हलविण्यात आले असून सदर अपघाताची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सपोनि सतीश पवार करीत आहेत.