बाळेकुंद्री खुर्द येथे खास नवरात्रोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन
वार्ताहर /सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथे खास नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौड कमिटीच्यावतीने आयोजित खुल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तारिहाळच्या प्रशांत बुद्धनगौडा पाटील याने 5 कि.मी. अंतर केवळ 14 मिनिटे 48 सेकंदात पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकाविला. बुधवार दि. 13 रोजी येथील कलमेश्वर मंदिरासमोर खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ता. पं. माजी सदस्य निलेश चंदगडकर यांनी दुर्गामातेचे पूजन करून स्पर्धेचा शुभारंभ केला. स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे- प्रथम प्रशांत बुद्धनगौडा पाटील-तारिहाळ, द्वितीय यश विठ्ठल जक्कन्नावर-मुतगा, तृतीय प्रेम यल्लाप्पा बुरुड-कावळेवाडी, चौथा किशोर यल्लाप्पा सावंत-येळ्ळूर, पाचवा सुमित यल्लाप्पा चौगुले-मुतगा. स्पर्धेमध्ये एकूण 60 स्पर्धकांनी भाग घेतला होता. विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
ज्येष्ठ स्पर्धकांचा सत्कार
या स्पर्धेमध्ये तीन ज्येष्ठ स्पर्धकांनीही भाग घेतला होता. दुंडुराम शिंदे हिंडलगा, सुरेश देवरमनी बेळगाव व सुरेश सावगावकर हिंडलगा या तिन्ही ज्येष्ठ स्पर्धकांचा मंडळाच्यावतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुतगा येथील भावकेश्वरी स्पोर्टस् ऍकॅडमीच्या पदाधिकाऱयांचे व सदस्यांचे सहकार्य लाभले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अक्षय निलजकर, ऋतिक पाटील, जोतिबा नागेनट्टी, प्रवीण मुरारी, विशाल पाटील, सचिन चिनवाल, श्याम कन्नेकर, गजानन पाटील, सखाराम पाटील, परशुराम होनगोजी, राहुल बेळगावकर, संदीप बेळगावकर, मोहन बाळुन्नावरसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेनंतर श्री भावकेश्वरी स्पोर्टस् अकॅडमीच्या मुलांनी व मुलींनी चित्तथरारक कवायती सादर करून सर्वांची वाहव्वा मिळविली.