खा. धैर्यशील माने यांच्या प्रयत्नाला यश
टाेप/ प्रतिनिधी
महाराष्ट्रातील धनगर व सर्व मेढंपाळ बांधवाना विनाअट बिनशर्थ महाराष्ट्रात कोणत्याही जिल्हात पशुधन मेंढरे, शेळी यांना स्थलांतर करून चरण्यासाठी सर्व ठिकाणी शेतकरी ऍग्रीक्लचरल प्रमाणे परवानगी देण्यात यावी. अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली हाेती. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांनी तात्काळ सर्व जिल्हाधिकारी, पोलिस महासंचालक, जिल्हापाेलिस प्रमुख, पशुसवर्धन सचिव, प्रांताधिकारी, तहसिलदार यांना आदेश देण्यात आले आहेत.
गेली अनेक दिवस झाले जिल्ह्यातून पर जिल्हात जाण्यास मेंढपाळांना परवानगी नव्हती. याबाबत धनगर शिष्टमंडळ हातकणंगले खा. धैर्यशिल माने यांना याबाबतीत निवेदन दिले असता खासदार माने यांनी तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देवुन पुन्हा प्रधान सचिव भूषण गगराणी व विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांच्याशी संपर्क साधून परवानगी देण्यासाठी प्रयत्न केले. परवानगी दिल्याने याचा याचा लाभ महाराष्ट्रातील सर्व मेढंपाळ धनगर यांना झाला. गेली तीन महिने झाले प्रत्येक जिल्हात धनगर मेढंपाळ अडकून बसले होते, त्या मेंढपाळाना गावी येण्यास कोणतीही अडचण येणार नाही. खा. धैर्यशिल माने यांच्या प्रयत्नाने हा मोठा प्रश्न निकालात निघाला आहे. त्यामुळे धनगर समाज बांधवातुन काैतुक हाेत आहे. यावेळी राजु आरगे, संजय वाघमाेडे, राम कोळेकर, प्रा.लक्ष्मण करपे ,संभाजी गावडे, अनिल वळकुंजे, संभाजी शिनगारे ,जग्गनाथ माने, काशिनाथ शिनगारे सुनिल सलगर विकास घागरे मच्छिंद्र बनसाेडे उपस्थित हाेते.
Previous Articleकासचे पाणी दोन दिवस बंद राहणार
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.