मेकअप करणे ही जशी एक कला आहे, तसा तो व्यवस्थितरित्या उतरवताही आला पाहिजे. मेकअप उतरवताना सावकाशपणे उतरविला पाहिजे. घाईघाईने हे काम केले तर त्वचेला इजा होऊ शकते. दिवसभरात केलेला मेकअप रात्री काढणे आवश्यक असते. त्याला क्लिंजिंग असे म्हटले जाते. काम करत असताना आपल्या चेहर्यावर घाम व तेलकटपणा येत असतो व घाम आपल्या त्चचेत मुरतो. मेकअप काढण्यात हलगर्जीपणा केला तर त्वचेला ऍलर्जी होण्याची शक्यता असते. धूळ, माती व घाम यांचा थर चेहर्यावर घट्ट बसला तर डीप क्लिंजींगद्वारा काढले जाऊ शकते. रात्री मेकअप व्यवस्थित काढून शांत झोप घेतल्याने दुसर्या दिवशी फ्रेश वाटते. कामाचा ताण येत नाही. दुसर्या दिवशी मेकअप करतानाही उत्साह वाटतो.
Previous Articleहॉटस्पॉट तालुक्यांमध्येही संसर्ग आटोक्यात
Next Article कर्नाटकात मागील २४ तासात ६७७ नवीन रुग्ण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.