वृत्तसंस्था/ एर्लिंग्टन
येथे शनिवारी आयोजित केलेल्या मुष्टीयुद्ध लढतीत मेक्सिकोच्या सॉल अल्वारेझने आपला प्रतिस्पर्धी बिली जो साँडर्सचा पराभव करत डब्ल्यूबीसी आणि डब्ल्यूबीए तसेच ब्रिटनच्या डब्ल्यूबीओ सुपर मिडलवेट गटातील जेतेपद पटकाविले.
अल्वारेझ आणि साँडर्स यांच्यातील ही लढत आठ फेऱयांची आयोजित केली होती. या लढतीला 73 हजारापेक्षा अधिक विक्रमी शौकिन उपस्थित होते. अल्वारेझने आठव्या फेरीत 31 वर्षीय साँडर्सला पराभूत केले. अल्वारेझला पंचांनी तांत्रिक गुणांवर विजयी म्हणून घोषित केले.