वृत्तसंस्था / मेक्सिको सिटी
23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱया मेक्सिकन बेसबॉल संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे मेक्सिकोच्या ऑलिंपिक पथक प्रमुखानी सांगितले.
या स्पर्धेसाठी मेक्सिकोच्या बेसबॉल संघटनेतर्फे निवड चाचणी आयोजित केली होती. या चाचणीवेळी मेक्सिकोचे हेक्टर व्हेलाझक्वेझ आणि सॅमी सोलिस हे दोन बेसबॉलपटू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यानंतर तातडीने सराव शिबीर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. टोकियोला प्रयाण करण्यापूर्वी पुन्हा एकदा मेक्सिकोच्या पथकातील सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी सोमवारी सकाळी घेण्यात आली. ऑलिंपिक स्पर्धेसाठी पहिल्यांदाच मेक्सिकोचा बेसबॉल संघ पात्र ठरला आहे. आता हा संघ बुधवारी टोकियोला प्रयाण करणार आहे. मेक्सिको बेसबॉल संघाचा ऑलिंपिक स्पर्धेतील पहिला सामना 30 जुलैला डॉम्निक प्रजासत्ताक बरोबर होणार आहे.