ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोत आतापर्यंत 16 लाख 49 हजार 502 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 41 हजार 248 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
सोमवारी या देशात 11 हजार 170 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 463 जणांचा मृत्यू झाला.16.49 लाख रुग्णांपैकी 12 लाख 37 हजार 321 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2 लाख 70 हजार 933 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 5359 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिको जगात तेराव्या क्रमांकावर आहे. तर कोरोनाबळींच्या संख्येत या देशाचा चौथा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 41 लाख 39 हजार 021 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.