ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोत आतापर्यंत 9 लाख 18 हजार 811 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 91 हजार 289 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मेक्सिकोत शुक्रवारी 5948 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 464 जणांचा मृत्यू झाला. 9.18 लाख रुग्णांपैकी 6 लाख 73 हजार 457 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 54 हजार 065 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2838 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिकोचा जगात दहावा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत चौथा क्रमांक लागतो. मेक्सिकोत आतापर्यंत 23 लाख 86 हजार 284 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.