ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोत कोरोनाबळींच्या संख्येने 75 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मेक्सिकोत आतापर्यंत 7 लाख 20 हजार 858 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 75 हजार 884 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
मेक्सिकोत शुक्रवारी 5408 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 490 जणांचा मृत्यू झाला. 7.20 लाख रुग्णांपैकी 5 लाख 18 हजार 204 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 26 हजार 810 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2699 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिकोचा जगात आठवा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत चौथा क्रमांक लागतो. मेक्सिकोत आतापर्यंत 16 लाख 50 हजार 899 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.