मेक्सिको ;
कोरोना महामारीचा विळखा मेक्सिको देशालाही बसला असून तेथील तज्ञांच्या मते या रोगाने मृत्यूची एकंदर संख्या 3 लाखावर पोहचू शकते. उत्तर अमेरिकेच्या दक्षिणेला असणाऱया या देशात दररोजच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता सदरचा इशारा वजा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सुटीचा हंगाम व पर्यटकांना निर्बंध नसल्याने ओमिक्रॉनला आपले पाय पसरण्याची संधी मिळाली आहे. अमेरिकेतून आलेल्या पर्यटकांची संख्या मोठी होती. गेल्या आठवडय़ात कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारावर पोहोचल्याने चिंता वाढलीय. खबरदारी म्हणून मेक्सिकोतील 32 राज्यांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सद्यस्थितीला घेणे आवश्यक होते, असे सरकारने म्हटले आहे. मेक्सिकोत सध्या पर्यटनाला बहर आला असून लोकांनी मास्क वापरणे व इतर बाबींकडे दुर्लक्ष केले आहे. लोकांना तर पर्वा नाहीच पण सरकारनेही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जनतेतून होत आहे.