ऑनलाईन टीम / मेक्सिको सिटी :
मेक्सिकोत कोरोनाबाधितांच्या संख्येने 11 लाखांचा आकडा गाठला आहे. तिथे आतापर्यंत 11 लाख 07 हजार 071 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 1 लाख 05 हजार 655 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
रविवारी या देशात 10 हजार 008 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 586 जणांचा मृत्यू झाला. 11.07 लाख रुग्णांपैकी 8 लाख 18 हजार 397 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 83 हजार 019 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 3335 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत मेक्सिकोचा जगात अकरावा क्रमांक लागतो. तर कोरोनाबळींच्या संख्येत चौथा क्रमांक लागतो. मेक्सिकोत आतापर्यंत 28 लाख 59 हजार 239 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.