वृत्तसंस्था/ मेक्सिको सिटी
रविवारी येथे झालेल्या मेक्सिको सिटी एफ-वन ग्रा प्रि मोटार शर्यतीचे विजेतेपद मॅक्स व्हर्स्टेपनने पटकाविले. या जेतेपदामुळे व्हर्स्टेपनने स्पर्धेच्या सांघिक चॅम्पियन्सशीप विभागात प्रतिस्पर्धी हॅमिल्टनवर 19 गुणांची आघाडी मिळविली आहे.
चालक मॅक्स व्हर्स्टेपनने आपल्या रेसिंग कारकिर्दीत विक्रमी तिसऱयांदा मेक्सिको स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. रविवारी झालेल्या शर्यतीत व्हर्स्टेपनने मॅसिर्डीस चालक हॅमिल्टन आणि रेड बुल चालक सर्जिओ पेरेझला मागे टाकले. हॅमिल्टन दुसऱया स्थानावर तर पेरेझ तिसऱया स्थानावर राहिले. पिएरीने चौथे तर बोटासने पाचवे, कार्लोस सेंझने सहावे स्थान मिळविले. सेबेस्टियन व्हेट्टलला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.