प्रतिनिधी / धारबांदोडा
मेटवाडा कुळे येथे दूधसागर नदीच्या काठावर जखमी अवस्थेत आढळलेल्या मगरीला सुरक्षितरित्या पकडून उपचारासाठी बोंडला अभयारण्यात पाठविण्यात आले आहे. अंदाजे 12 फूट लांबीच्या या मगरीवर बिबटय़ाने हल्ला करून तिला जखमी केल्याचा कयास वनखात्याने व्यक्त केला आहे.
बुधवारी सकाळी मेटवाडा येथील नदीच्या काठावर जखमी अवस्थेत पहुडलेली ही मगर स्थानिकांच्या दृष्टीस पडली. वनखात्याला त्या संबंधी माहिती दिल्यानंतर रेस्क्युपथकाने तिला सुरक्षितरित्या जेरबंद करून उपचारासाठी बोंडला अभयारण्यात पाठविले. कुळे विभागीय वनअधिकारी श्यामसुंदर गांवस यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री एखाद्या बिबटय़ाने या मगरीवर हल्ला केला असावा. मगरीच्या जबडय़ाला जबर दुखापत झालेली आहे.