बाजारमूल्यात 2.22 लाख कोटी रुपयांचा तोटा
वृत्तसंस्था/ मुंबई
मेटाच्या समभागांमध्ये 26 टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना फटका बसला आहे. परिणामी कंपनीचे बाजारमूल्य 2.22 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार ही अमेरिकन कंपनीच्या मूल्यावर आधारीत एका दिवसातली सर्वात मोठी घसरण राहिल्याची नेंद केली आहे.
समभागाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्याने झुकरबर्ग 2015 नंतर जगातील टॉपच्या 10 श्रीमंतांच्या यादीतून प्रथमच बाहेर पडले आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार गुरुवारी मेटाचे समभाग 26 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. त्याच्या एक दिवस आधी कंपनीचे समभाग 20 टक्क्यांनी वधारले होते.
मिम्सचा पाऊस
सदरच्या मोठय़ा घसरणीच्या प्रभावामुळे विविध प्रकारच्या मिम्सचा पाऊस सोशल मीडियावर पडल्याचे दिसून आले. रिंकी नावाच्या एका युजर्सने रेखाच्या एका गाण्यावर >?ुझे तुम नजर से गिरा तो रहे हो’ असे शेअर केले आहे.