नवी दिल्ली
पादत्राणांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी मेट्रो ब्रँडस लिमिटेड येत्या काळात आपल्या स्टोअर्सच्या संख्येत वाढ करण्याचा इरादा बाळगून आहे. पुढील दोन ते अडीच वर्षाच्या काळात आपली 219 नवी स्टोअर्स सुरू करणार असल्याचे मेट्रो ब्रँडस लिमिटेडने म्हटले आहे. समभाग विक्रीतून कंपनीने 250 कोटी रुपये उभारले असून सध्याला कंपनीची 29 राज्यात मिळून 134 शहरात 586 स्टोअर्स कार्यरत आहेत.