वार्ताहर/ केळघर
मेढा व केळघर येथे ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर उभारण्या संदर्भात मेढा व केळघर विभागातील गगनगिरी महाराज ट्रस्ट, मुंबई मलबार हिल येथील अध्यात्मिक निसर्गरम्य सभागृहात चर्चा आयोजित केली होती. पुनवडी गावचे सुपूत्र अशोकदादा पार्टे यांच्या विशेष प्रयत्नाने व ट्रस्टचे विश्वस्त, समाजसेवक संजय शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक झाली. याप्रसंगी तहसीलदार शरद पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांना कोविड सेंटर उभारण्या संदर्भात सर्व बाबींची माहिती घेऊन त्यासंदर्भात युध्दपातळीवर पाठपुरावा करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी बॉडारवाडी धरण कृती समितीचे अध्यक्ष विजयराव मोकाशी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथदादा ओंबळे, उद्योजक व समाजसेवक राजुशेठ धनावडे, कोल्हापुर जिल्हा संपर्क प्रमुख दिव्या बडवे, उद्योजक विजय सावले (भाऊ), वेण्णा निरंजना पतसंस्थेचे संचालक विनोददादा शिंगटे, भैरवनाथ चॅरिटेबल ट्रस्टचे दिपकदादा मोरे, पुनवडी गावचे सुपूत्र संतोष पार्टे, आदी मान्यवर उपस्थित होते.