सातारा : मेढा नगरपंचायत आणि सातारा नगरपालिकेच्या हद्दीतील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मेढा आणि सातारा पालिकेसाठी 2 कोटी 50 लाखांचा निधी मिळवून दिला आहे.
या निधीतून मेढा नगरपंचायत हद्दीतील 11 आणि सातारा पालिका हद्दीतील 11 अशी एकूण 22 विकासकामे मार्गी लागणार आहेत.