108 दिवसाची नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याप्रित्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन
वार्ताहर /लाटंबार्से
गोमंतकाचे तसेच डिचोली तालुक्मयातील मेणकुरेचे सुपुत्र तसेच श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदाय – गोवाचे अध्यक्ष देवानंद दत्ताराम नाईक यांनी आपल्या दोन साथीदारांसह ‘नर्मदा परिक्रमा’ करून गोव्यात परतले. यानिमित्त त्यांनी मेणकुरे येथील आपल्या निवसास्थनी गुरुवारी 31 रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यानिमित्त संध्या. ठीक 5.00 वा. हौशी कलाकारांतर्फे भजनाचा तसेच संगीत कार्यक्रम होणार आहे, तर शेवटी श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदायाच्या हरिपाठाने सोहळय़ाची सांगता होणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वारकरी संप्रदायातर्फे केले आहे.