साहित्य : 1 वाटी बारीक चिरलेली मेथी, दीड वाटी मशरूम, 2 चमचे तूप, 1 छोटा दालचिनी तुकडा, 1 मोठी वेलची, 2 छोटी वेलची, 2 लवंग, 1 तमालपत्र, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा आलं पेस्ट, 1 चमचा लसूण पेस्ट, अर्धा चमचा हिरवी मिरची पेस्ट, अर्धी वाटी टोमॅटो पल्प, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 चमचा धणेपूड, पाव वाटी दही, चवीपुरते मीठ, 1 चमचा साखर
कृती : गरम तुपात दालचिनी, मोठी-छोटी वेलची, लवंग आणि तमालपत्र टाकून मिनिटभर परतवावे. नंतर त्यात कांदा टाकून 7 ते 8 मिनिटे परतवावा. आता त्यात आलं-लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट टाकून मिनिटभर मिश्रण मिक्स करावे. नंतर टोमॅटो पल्प, हळद पावडर, लाल तिखट पावडर आणि धणेपूड टाकून मिश्रण पाच मिनिटे परतवावे. आता त्यात मेथी टाकून मिश्रण पाच मिनिटे शिजवून घ्यावे. नंतर मशरूम आणि मीठ टाकून मिश्रण मिक्स करून शिजवावे. शेवटी साखर आणि पाव वाटी पाणी ओतून मिश्रण दोन मिनिटे शिजवून तयार भाजी रोटी अथवा नानसोबत द्या.