मेदव्हेदेव, सिटसिपेस उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ टोरँटो
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या टोरँटो मास्टर्स पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाचा डॅनील मेदव्हेदेव आणि ग्रीकचा सिटसिपेस यांनी एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
शुक्रवारी झालेल्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मेदव्हेदेवने पोलंडच्या हुबर्ट हुरकेझचा 2-6, 7-6 (8-6), 7-6 (7-5) असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. मेदव्हेदेव आणि इस्नेर तसेच सिटसिपेस व अमेरिकेचा ओपेल्का यांच्यात उपांत्य लढती होणार आहे. दुसऱया एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रीकच्या सिटसिपेसने नॉर्वेच्या रूडचा 6-1, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. अमेरिकेच्या ओपेल्काने स्पेनच्या ऍग्युटवर 6-3, 7-6 (7-1) अशी मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.