ऑनलाईन टीम / मेरठ :
मेरठ जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण कमी होण्याचे प्रमाण काही थांबत नाही आहे. बुधवारी 24 नवे रुग्ण आढळून आले. त्यातच फलावदा भागात राहणाऱ्या एका नागरिकांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू देखील झाला आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 52 वर पोहोचली आहे.
या रोगाचा शिकार बनलेल्या 8 रूग्णांचा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार चालू आहे. तर 5 जण आनंद रुग्णालय, 2 जण लोकप्रिय रुग्णालयात आणि 5 जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे रुग्ण मेरठसह हापुड, बुलंदशहर, अमरोहा, गाझियाबाद, शामली आणि मुरादनगर येथील रहिवासी आहेत. यातील काही जणांना कोरोनाची देखील बाधा झाली आहे.
- उपचारासाठी केवळ 66 इंजेक्शन उपलब्ध
म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी मेडिकल कॉलेजकडे केवळ 66 इंजेक्शन उपलब्ध आहेत. याचे नाव एंफोटेरिसन – बी 50 एमजी असे आहे. येथील एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्यक्तीच्या वजनानुसार याचे डोस दिले जातात.