प्रतिनिधी /पणजी
कारमीभाट-मेरशी येथील श्री सातेरी दिवस्थानच्या नुकत्याच झालेल्या आमसभेत देवस्थानच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी गिरीश उस्कईकर यांची तर उपाध्यक्षपदी देवानंद अर्जून नाईक यांची निवड झाली आहे.
प्रसाद उस्कईकर यांची खजिनदारपदी तर साईनाथ शिरोडकर यांची सहायक खजिनदारपदी निवड झाली आहे. प्रवीण उस्कईकर सचिवपदी तर सदानंद कांदोळकर यांची सहायक सचिवपदी निवड करण्यात आली आहे. पांडुरंग चोपडेकर, विष्णु सांतीनेझकर, विवेक उस्कईकर, हेमंत गोलतकर, मिननाथ चोपडेकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.