विजय सेतुपतिसोबत साकारतेय विशेष भूमिका
अभिनेत्री कॅटरिना कैफ स्वतःच्या चित्रपटांवरून अत्यंत चर्चेत असते. तिने आता श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाच्या अंतर्गत तयार होणारा आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’चे चित्रिकरण सुरू केले आहे. कॅटरिनाने सेटवरील छायाचित्र शेअर करत चित्रिकरण सुरू झाल्याची माहिती दिली आहे. या छायाचित्रात क्लॅपबोर्ड दिसून येतोय.
विजय सेतुपति आणि कॅटरिना यांच्या या चित्रपटाच्या पहिल्या शेडय़ूलचे मुंबईत चित्रिकरण करण्यात आले होते. मागील वर्षी नाताळावेळी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी स्वतःच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होत. चित्रपटात दक्षिणेतील सुपरस्टार विजय सेतुपतिसोबत कॅटरिना मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
चित्रपटाची निर्मिती टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेट, मॅचबॉक्स पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनर अंतर्गत रमेश तौरानी करत आहेत. चित्रपट यंदा नाताळापूर्वी 23 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. कॅटरिना याचबरोबर सलमान खान सोबत टायगर 3 चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच फोन भूत चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणर आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत असणार आहेत.