प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील मेर्वी येथे बिबटय़ाला जेरबंद केल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडलेल्या ग्रामस्थांमध्ये लगेचच दुसऱया एका बिबटय़ाच्या हल्ल्याने दहशतीचे वातावरण पसरले आह़े रानात चरण्यासाठी गेलेल्या वासरावर गुरूवारी दुपारी बिबटय़ाने हल्ला करून जखमी केल़े मेर्वी पंचक्रोशीत बिबटय़ाकडून होणाऱया हल्ल्यांमुळे वनविभागाची डोकेदुखी वाढली आह़े
मेर्वी परिसरात राहणाऱया मारूती आत्माराम खरडे यांच्या मालकीची गुरे रानात चरण्यासाठी सोडलेली होत़ी यावेळी दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने वासरावर हल्ला करून जखमी केल़े या घटनेची माहिती तत्काळ वनविभागाला देण्यात आल़ी गुरूवारी पिंजऱयात अडकलेल्या बिबटय़ामुळे आनंद व्यक्त होत असतानाच बिबटय़ाच्या आणखी एका हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आह़े गेल्या वर्षभरापासून मेर्वी पंचक्रोशीत बिबटय़ाच्या हल्ल्यांमुळे विविध ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होत़े तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व पुणे येथील पथकेही रत्ना†िगरीत दाखल झाली होत़ी मात्र सातत्याने बिबटय़ाकडून हुलकावणी दिली जात होत़ी दरम्यान हल्ला करणारी मादी बिबटय़ा असून तिला दोन लहान बछडे आहेत़ यामुळेच मादी बिबटय़ाचा बछडय़ांच्या सुरक्षेसाठी हल्ला करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱयामध्ये गुरूवारी नर बिबटय़ा अडकला होत़ा पंचक्रोशीतील हल्ला करणारा बिबटय़ा पिंजऱयात अडकल्याने सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला होत़ा मात्र दुपारी पुन्हा एकादा वासरावर झालेल्या हल्ल्याने चिंतेचे वातावरण पसरले आह़े या घटनेची दखल घेवून वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहेत़