मेलबर्न : ऑस्ट्रेलियातील बिग बॅश टी-20 लीग स्पर्धेत आता भारताचा फलंदाज उन्मुक्त चंद खेळणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया मेलबर्न रेनिगेड्स प्रँचायझीने उन्मुक्त चंदशी करार केला.
भारत अ संघाचा तसेच 19 वर्षांखालील भारताच्या युवा संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदला या स्पर्धेतील अनुभव विशेष महत्त्वाचा ठरु शकतो. या स्पर्धेत सहभागी होणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. मेलबर्न रेनिगेड्स संघाचे नेतृत्व फिंचकडे सोपविण्यात आले आहे. उन्मुक्त चंद सध्या अमेरिकेत असून तो या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाला प्रयाण करणार आहे.