ऑनलाईन टीम / धारणी :
मेळघाटच्या जंगलात पांढऱ्या अस्वलाचे दर्शन झाल्याने मेळघाटच्या वैभवात वाढ झाली आहे. सहा वर्षांपूर्वीही मेळघाटच्या जंगलात पांढरे अस्वल दिसल्याची नोंद वनविभागाकडे आहे.
मेळघाटच्या जंगलातील सिपना वन्यजीव विभागाच्या कॅमेर्यात 4 मार्च रोजी सकाळी 5 वाजून 38 मिनिटानी पांढरे अस्वल (मादी) ट्रॅप झाली. यापूर्वी 2014 मध्ये चिखलदराच्या जंगलातही पांढरे अस्वल आढळून आले आहे. तसेच बोर अभयारण्यात तथा गुजरातच्या दाहोदच्या जंगलात तपकिरी रंगाचे अस्वल यापूर्वी दिसले होते. मात्र पांढरे शुभ्र दिसण्याची प्रथम घटना मेळघाटातच झाल्याने विदर्भाची मान उंचावलेली आहे.
शरीरातील रंग द्रव्याच्या थरांमध्ये अनुवांशिक परम्परेनुसार बदल झाल्यास पांढरा रंग प्राणी धारण करतात. मेळघाटात या मादीच्या अस्तित्वामुळे नर तथा पांढरे बछडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.