पणजी / प्रतिनिधी
आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या एका कार्यकर्त्याची विश्वेश प्रभूची सुटका करण्याची मागणी करत वाळपई पोलिस ठाण्यासमोर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. स्थानिकांच्या प्रश्नांचा विचार न करता आयआयटी स्थापन करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी मेळावली ग्रामस्था?नी केलेल्या निषेधात विश्वेश सक्रियपणे सहभागी होता. विश्वेशह्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली असून तो कोरोना पेशंट आहे.
“आम्ही येथे आमचा कार्यकर्ता विश्वेश प्रभू याच्या बेकायदेशीर अटकेचा निषेध करण्यासाठी आलो आहोत. विश्वेश कोविड पेशंट आहे आणि त्याला अटक करण्यासाठी सर्व निकषांचे उल्लंघन केले गेले, त्यामुळे ह्या सगळय़ात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास ह्या सगळय़ास जबाबदार कोण? लोकशाहीवर आपले मत मांडणे हा गुन्हा असल्यास आम्हा सर्वांना अटक करा,” असं राहुल म्हांबरे म्हणाले
आयआयटी प्रोजेक्ट कितीही गरजेचा असला तरीही गावकऱयांवर त्यांच्या इच्छेविरुद्ध तो का लादला जातोय? सरकार गावकऱयांच्या ह्या बाबतीतील सर्व शंका दूर करण्यात पुर्णपणे अपयशी ठरले आहे, सरकारने जर पूर्वीच सर्व भागधारकांना हाताशी धरुन चर्चा केली असती बरे झाले असते.
“जनतेचा आवाज दाबुन न ठेवणं ह्याला लोकशाही म्हणतात. मेळावलीच्या ग्रामस्था?नी ह्या संदर्भात सरकारकडे श्वेतपत्रिकेची मागणी केली आहे पण सरकार या बदल्यात आपल्या बळाच्या जोरावर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे”, असेही राहुल म्हांबरे म्हणाले.
सरकार सर्व वडिलोपार्जित जमीनी कशासाठी हडप करत आहे? त्या जमीनीवर लोकांची झाडे आणि विविध पिके आहेत. आणि म्हणूनच लोकांना सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यावर उत्तर देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकार मेळावलीच्या रहिवाशांचा आवाज दाबण्यासाठी पोलिस दलाचा वापर करीत आहे. गोव्यामध्ये अशा काळा दिवसाची आम्ही कधीही अपेक्षा केली नव्हती जिथे लोकांचा आवाज अशाप्रकारे दडपला जाईल.
वाळपई पोलिस ठाण्यासमोर हजारो ग्रामस्थानी एकत्र येऊन सरकारकडे ह्या झाल्या प्रकाराचे सर्व स्पष्टीकरण मागीतले आहे. “विश्वजित राणे यांची घराणेशाही गोमंतकीयांना मान्य नाही आणि निषेधात सामील झालेल्यांची संख्या बघता हे त्याचे स्पष्ट संकेत आहेत. आता वेळ आली आहे जेव्हा श्री राणे यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि “हुकुमशाही” ऐवजी लोकशाहीचा दृष्टिकोन वापरून लोकांशी चर्चा करावी आणि त्याबरोबरच
ग्रामस्था?विरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर तत्काळ रद्द करावी, असे राहुल म्हांबरे म्हणाले. , असे राहुल म्हांबरे म्हणाले.