वृत्तसंस्था/ पॅरीस
पॅरीस सेंट जर्मन फुटबॉल क्लबमधील (पीएसजी) चार फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू तसेच सातवेळा बॅलन डीओर पुरस्कार मिळविणाऱया लायोनेल मेसीचा समावेश आहे.
प्रेंच चषक फुटबॉल स्पर्धेतील सोमवारी रात्री होणाऱया सामन्यासाठी पीएसजी संघातील फुटबॉलपटूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये मेसी, बर्नेट, रिको व बिटुमाझिया हे दोषी आढळले आहेत. या चार फुटबॉलपटूंना सोमवारच्या सामन्यात खेळता येणार नसल्याचे या क्लबच्या प्रवक्त्याने सांगितले. आतापर्यंत सात फुटबॉलपटू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्या प्रकृतीमध्ये गंभीर लक्षणे दिसत नसल्याचे सांगण्यात आले. कोरोना बाधित फुटबॉलपटूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.