दिशा पाटनीने सांगितले फिटनेसचे रहस्य
दिशा पाटनी स्वतःच्या बोल्ड अदा आणि फिटनेसमुळे लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. दिशाने कमी वेळेत चित्रपटसृष्टीत चांगले यश मिळविले आहे. सध्या दिशा अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. दिशा सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते. अभिनेत्रीने एका संवादादरम्यान स्वतःच्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.
स्वतःच्या फिटनेसचे रहस्य सांगताना दिशाने ‘मेहनत’ असे उत्तर दिले आहे. एब्स महत्त्वाचे नसून तुमची तंदुरुस्ती महत्त्वाची असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. दिशा पाटनीने अलिकडेच डेनिम स्कर्टमधील स्वतःचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. या छायाचित्रावर चाहत्यांसह कलाकारही लाइक आणि कॉमेंट करत आहेत. दिशा पाटनी सध्या जॉन अब्राहमसोबत ‘एक विलेन 2’मध्ये काम करत आहे. याचबरोबर सलमान खानसोबत ‘राधे ः योर मोस्ट वाँटेड’मध्येही दिसून येणार आहे.