ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना आज पुन्हा नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मुफ्ती या आज शोपियांमध्ये संशयास्पद हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी जाणार होत्या. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना परवानगी नाकारण्यात आली असून, त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
शोपियां येथील एका शेतकऱ्याच्या सफरचंदाच्या बागेत काम करणाऱ्या शाहिद अहमद राथर याची संशयास्पदरित्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी मेहबुबा मुफ्ती आज शोपियांकडे रवाना होणार होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली असून, त्यांना नरजकैदेत ठेवण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप कोणतेही निवेदन नाही.