वृत्तसंस्था / पॅरीस
फ्रान्सच्या निकोलास मेहुत आणि पीयर हय़ुजेस हर्बर्ट या टेनिसपटूंनी शनिवारी येथे फ्रेंच ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद पटकाविले. आपल्या देशातील होणाऱया या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत दुसऱयांदा पुरूष दुहेरीचे अजिंक्यपद मिळविणारी मेहुत आणि हर्बर्ट ही फ्रान्सची पहिली टेनिसपटूंची जोडी ठरली आहे.
शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात मेहुत आणि हर्बर्ट यांनी कझाकस्तानच्या बुबलीक आणि गोलुबेव्ह यांचा 4-6, 7-6 (7-1), 6-4 असा पराभव केला. 2018 साली मेहुत आणि हर्बर्ट यांनी प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीचे जेतेपद मिळविले होते. फ्रान्सच्या या जोडीचे हे पाचवे ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद आहे. 2015 मध्ये अमेरिकन ओपन, 2016 मध्ये विम्बल्डन, 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅमचे जेतेपद मिळविले आहे. 2015 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मात्र त्यांना अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.