डोमिनिकामध्ये गेलेले अधिकारी मायदेशी परत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँकेला चूना लावून फरार झालेल्या आणि डोमिनिका येथे अटक करण्यात आलेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी विलंब होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याच्या प्रत्यार्पणासंबंधी न्यायालय निर्णय देणार असून त्याला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. साहजिकच किमान अजून महिनाभर तरी मेहुल चोक्सीला डोमिनिकातच राहावे लागणार आहे. त्याला सध्या पोलिसांच्या सुरक्षेत रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, मेहुल चोक्सीच्या घर वापसीच्या हेतूने डोमिनिकाला गेलेले भारतीय अधिकाऱयांचे पथक मायदेशी परतले आहे. त्याचे डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण व्हावे यासाठी प्रयत्न सुरु असून अधिकाऱयांचे एक पथक डोमिनिकात दाखल झाले होते. यामध्ये सीबीआयच्या दोन अधिकाऱयांचा समावेश होता. सध्या मेहुल चोक्सी अटकेत असून दोन वेगवेगळय़ा प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. जोपर्यंत या प्रकरणांची सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत मेहुल चोक्सीचे भारताकडे प्रत्यार्पण होणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
न्यायालयात मेहुल चोक्सी याने एक याचिका केली असून पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर होती का? तसेच त्याला कोणत्या देशात परत पाठवले जावे, यावर सुनावणी सुरु आहे. तर दुसऱया प्रकरणात मेहुल चोक्सीने बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. या दोन प्रकरणांचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मेहुल चोक्सीचे भारतात प्रत्यार्पण होणे अशक्मय असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.