प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावमधील अधिकाऱयांच्या पत्नींनी एकत्र येवून स्थापन केलेल्या मैत्री लेडीज क्लबच्यावतीने कांबळी खूट येथे महिलांसाठी स्वच्छतागृह सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी असंख्य भाजी विपेत्या महिला असून त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेवून क्लबने हा उपक्रम हाती घेतला.
गेल्या 45 वर्षांपासून येथील भाजी विपेत्या महिला स्वच्छतागृहांसाठी मागणी करत होत्या. मात्र मैत्री क्लबने त्यांची अपेक्षा प्रत्यक्षात पूर्ण केली. हे स्वच्छतागृह बुधवारी महिलांच्या सेवेत रुजू करण्यात आले. या प्रसंगी परमपूज्य अल्लमप्रभू स्वामी, राजयोगिनी अंबिका, सामाजिक कार्यकर्त्या असमा तोफेल आणि मनीषा बेनके तसेच नगरसेविका रेशमा पाटील उपस्थित होत्या.
शहरात महिलांसाठी उभे केलेले सुरक्षिता या नावाचे हे पहिले पिंक टॉयलेट आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सॅनिटरी वेंडींग मशिनची सोय करण्यात आली आहे. मराठा मंडळच्या अध्यक्षा राजश्री नागराजू यांनी संस्थेतील मुलींच्या सोयीसाठी नारी हे सॅनिटरी नॅपकीन तयार करण्याचे युनिट सुरू केले आहे. त्यांनी या पिंक टॉयलेटच्या सॅनिटरी वेंडींग मशिनसाठी सहकार्य केले.
मैत्री क्लबच्या या उपक्रमासाठी मनपा आयुक्त रुदेश घाळी, अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांचे सहकार्य लाभले. पिंक म्हणजेंच गुलाबी हा माचा रंग आहे आणि नारी ही आमची थीम आहे, असे मैत्री क्लबच्या सचिव मैत्रयी बिस्बास यांनी सांगितले. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या पत्नी तनुजा हिरेमठ, राजश्री नागराजू तसेच मैत्री क्लबच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.