बेळगावः बेळगावची ज्येष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिसपटू मैत्रेयी संगम बैलूर हिची कर्नाटक महिला टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापकपदी निवड झाली आहे. मैत्रेयी बैलूर हिने यापूर्वी राष्ट्रीय व राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत आपली चमक दाखवून अव्वल खेळाडूंमध्ये स्थान मिळविताना अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. तिच्या कामगिरीची दखल घेऊन कर्नाटक टेबल टेनिस संघटनेने मैत्रेयीचे कर्नाटक महिला टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षक व व्यवस्थापकपदी निवड केली. अर्चना कामत, खुशी विश्वनाथ, अनर्ग्या मंजुनाथ, यशस्विनी घोरपडे, मरिया रॉनी या राष्ट्रीय टेबल टेनिसपटुंची पंचकुला, चंदिगड येथे 15 ते 18 फेबुवारी दरम्यान होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेसाठी मैत्रेयी या खेळाडूंसोबत जाणार आहे. या निवडीनंतर मैत्रेयी बैलूरचा बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे खास गौरव करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते.
Previous Article11 वी ज्युनियर मास्टर दिव्यांग शरीरसौष्ठव स्पर्धा मार्चमध्ये
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.