माशेल येथील घटना
वार्ताहर / माशेल
माशेल येथील काराय मैदानावर क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळत असताना अचानक कोसळून एका खेळाडूचा दुर्देवी मृत्यू झाला. किशोर उर्फ रामा विश्वनाथ तारी (45, माडापै-माशेल) असे त्याचे नाव आहे. सदर घटना काल रविवारी सायंकाळी 5 वा. सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार काराय मैदानावर वेटरन्स स्पर्धा खेळविण्यात येत होती. दरम्यान किशोर खेळत असलेला माडापै संघ अंतिम फेरी पोचला होता. फायनलसाठी लाईनअप करताना अचानक छातील कळ आल्याने तो पाणी पिण्यासाठी गेला असता तिथेच कोसळला. अत्यवस्थ अवस्थेत त्याला बेतकी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. केशोर सार्वजनिक बांधकाम विभागात काला होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. आज सकाळी 11.30 वा. माडापै येथील स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्ससंस्कार करण्यात येणार आहे.