मुख्य औषध नियंत्रकांचा निर्णय, प्ला कंपनी वितरण करणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या औषध नियंत्रकांनी (ड्रग्ज कंट्रोलर) मॉडर्ना या विदेशी लसीला भारतात तातडीच्या परिस्थितीत उपयोगासाठी अनुमती दिली आहे. मुंबईत मुख्यालय असणारी ‘सिप्ला’ ही बहुराष्ट्रीय कंपनीने या लसीसाठी अनुमती मागितली होती. ही केवळ प्राथमिक अनुमती आहे. इन्डेम्निटी (हमी) चा प्रश्न नंतर सोडविण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मंगळवारी निती आयोगाकडून आरोग्यविषयक पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यात ही माहिती देण्यात आली. या अनुमतीमुळे भारतात विदेशी लसींसाठी दरवाजा मोकळा करण्यात आला. त्यामुळे भविष्यात आणखी विदेशी लसीही भारतात येऊ शकतील, असे प्रतिपादन निती आयोगाकडून करण्यात आले.
अमेरिकेकडून लस मिळणार
मॉडर्ना कंपनीने 27 जूनला भारताच्या औषध नियंत्रकांना अमेरिकेच्या एका महत्वपूर्ण निर्णयासंबंधी माहिती दिली होती. अमेरिकेने तिच्या जागतिक लसीकरण कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतालाही लसी देणगीच्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. कोव्हॅक्सच्या माध्यमातून या लसी देण्यात येणार आहेत. त्यामुळे औषध नियंत्रकांनी या लसी भारतात येणे सुलभ व्हावे म्हणून अनुमती दिली आहे.
नियंत्रित उपयोगासाठी
मॉडर्ना लसीला अनुमती देण्यात आली असली तरी ती सध्यातरी नियंत्रित उपयोगासाठी आहे. व्यापक प्रमाणात उपयोगासाठी या लसीला अनुमती देण्याचा निर्णय परिणाम बघून देण्यात येईल. प्रथम या लसीचा उपयोग 100 व्यक्तींवर करण्यात येईल. त्यांच्यावर होणाऱया परिणामांचा सविस्तर अहवाल सिप्लाने 7 दिवसांमध्ये सादर करायचा आहे. त्यानंतर व्यापक उपयोगासाठी अनुमती देण्यासंबंदी निर्णय घेण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले.
मॉडर्नाची कार्यपद्धती कशी आहे ?
इतर लसींच्या तुलनेत मॉडर्नाची शरीरात काम करण्याची पद्धत भिन्न आहे. ही लस रक्तात पोहचल्यानंतर पेशींना कोरोना विषाणूंवर मात करण्यासाठी सक्षम बनविते. ती एमआरएनए का तांत्रिक नावाने ओळखली जाते. ती 90 टक्के प्रभावी आहे. अमेरिकेचीच फायझर ही लसही 90 टक्के प्रभावी आहे. या दोन्ही लसी विकसीत देशांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. अमेरिकेच्या 35 कोटी लोकसंख्येपैकी 12 कोटी लोकांना फायझर किंवा मॉडर्ना या लस देण्यात आलेली आहे. त्यांचे फारसे दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत.
भारतातील चौथी लस
मॉडर्ना ही भारतात उपलब्ध होणारी चौथी लस असेल. यापूर्वी कोव्हॅक्सिन, कोव्हीशिल्ड आणि स्पुटनिक या लसी भारतात उपलब्ध होत आहेत. आगामी काही महिन्यांमध्ये आणखीही लसी उपलब्ध होऊ शकणार आहेत. सध्या भारतात या चार लसींसह एकंदर बारा लसींवर काम सुरू आहे. त्याचप्रमाणे कोरोनावर गुणकारी ठरणारे एक औषध डीआरडीओकडून निर्माण करण्यात आले असून ते उपलब्ध आहे. आणखी दोन औषधांवर काम सुरू आहे, असे सांगण्यात आले.
मॉडर्नाचे आगमन केव्हा
ड तातडीच्या परिस्थितीत लसीला उपयोगासाठी अनुमती
ड 100 जणांवरच्या प्रायोगिक उपयोगानंतर अंमित निर्णय
ड भारतात उपलब्ध होत असलेली ही चौथी कोरोना लस ड आणखी विदेशी लसींना लवकरच अनुमती मिळणे शक्य