एका अमेरिकन मॉडेलने स्वतःचा एक अनुभव लोकांसोबत शेअर केला आहे. या मॉडेलचे नाव एली रे असून तिच्या एका चाहत्याने तिचे दातच मागितले होते. याच्या बदल्यात तो भरपूर पैसे देण्यासही तयार होता.
माझा चाहता माझ्या दातांवर प्रचंड प्रेम करत होता असे एलीने सांगितले आहे. एली रे ही मॉडेल अमेरिकेच्या बोस्टन शहरात राहते. चाहत्याने माझे दात खरेदी करण्याचा हट्ट धरला होता. एका दाताकरता तो मला 15 लाख रुपये देण्यास तयार होता असे एलीने म्हटले आहे.
एलीच्या चाहत्याने तिच्या दाताच्या डॉक्टरवर होणारा खर्चही उचलण्याची तयारी दर्शविली होती. तो दात काढून घेण्याचा आणि बसवून घेण्याचा खर्च देऊ पाहत होता. परंतु चाहत्याची मागणी ऐकून मला धक्काच बसल्याचे एलीने सांगितले आहे. एलीने स्वतःच्या या चाहत्याला दात देण्यास नकार दिला होता. या घटनेविषयी आठवले तरीही मला हसू येत असल्याचे ती सांगते.
एली रे यापूर्वी नर्स म्हणून काम करत होती. परंतु आता तिने हे काम सोडले आहे. ती स्वतःच्या पतीसोबत आता व्यवसाय सांभाळत आहे. तिने सुमारे 15 वर्षांपर्यंत नर्स म्हणून काम केले होते. नव्या व्यवसायातून ती आता लाखो रुपये कमावत आहे. लोक आता तिला करोडपती एली रे अशी हाक मारतात.