प्रतिनिधी/ मडगाव
मॉडेल मिलिंद सोमण यांनी वार्का समुद्रकिनाऱयावर आपल्या वाढदिनी नग्नअवस्थेत फोटो शूट केल्याने त्यांच्या विरोधात गोवा सुरक्षा मंचने कोलवा पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली होती. या प्रकरणात पोलीस चौकशीसाठी उपस्थितीत राहण्यासाठी मिलिंद सोमण यांना समस्य बजावण्यात येणार असल्याची माहिती कोलवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी दिली आहे.
मिलिंद सोमण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आपली पत्नी अनिता कुवर हिच्यासह वार्का येथील कारावेला बीच रिसोर्टमध्ये उतरला होता. वाढदिवसाच्या दिवशीच मिलिंद सोमण नग्न अवस्थेत वार्का समुद्रकिनाऱयावर धाव असताना, त्याची पत्नी अनिता हिने फोटो शूट केला होता. हा फोटो मिलिंद सोमणने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर तो सोशल मिडियावर व्हायरल झाला.
नग्न अवस्थेत फोटो शूट करून तो सोशल मिडियावर व्हायरल करून गोव्याची बदनामी केली जात असल्याने गोवा सुरक्ष मंचने वास्को पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली होती. मात्र, हे प्रकरण कोलवा पोलीस स्थानकाच्या हद्दित घडल्याने, ते कोलवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानतंर कोलवा पोलिसांनी मिलिंद सोमणच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
अभिनेत्री पूनम पांडेने काणकोणच्या चापोली धरणावर नग्न अवस्थेत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आल्याने गोव्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी पूनम पांडे व तिचा पती सॅम बॉम्बे यांना अटक करून नंतर जामीनावर त्याची सुटका करण्यात आली होती. आत्ता मॉडेल मिलिंद सामणच्या अडचणी वाढल्या आहेत. कोलवा पोलीस त्याला ताब्यात घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.