प्रतिनिधी / सातारा
कोरोनाची भीती अजून ही नागरीकाना नाही.जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हयात संचार बंदी असतानाही काही टुकार नेहमीच्या सवयीप्रमाणे किल्ले अंजिक्यतारा रस्त्यावर मॉर्निग वॉक ला गेल्याने त्यांच्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली.त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
सातारा पोलीस दल व जिल्हा प्रशासनाने सतत आवाहन करत आहे घराबाहेर पडू नका तरीही काही लोक नेहमीच्या सवयीने घराबाहेर पडतात.किल्ले अंजिक्य तारा रस्ता हा सकाळी आणि संध्याकाळी नेहमी इतरवेळी गजबजलेल्या स्थितीत पहायला मिळतो.शुक्रवारी सकाळी पोलिसांनी मॉर्निग वॉक ला गेलेल्यावर पोलिसांनी कारवाई केली.त्याना समज देऊन सोडण्यात आले.